Girish Mahajan, Eknath Khadse, Devendra Fadnavis
Girish Mahajan, Eknath Khadse, Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

Vidhan Parishad Election : खडसे ठरले बाजीगर, भाजपचे मनसुबे धुळीला

Published by : Jitendra Zavar

जळगाव जिल्ह्यात सध्या भाजपचे (BJP) नेते माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु नेहमीच सुरु असते. जळगावातील ही लढाई सोमवारी मुंबईत झाली. यात एकनाथ खडसे बाजीगर ठरले. त्यांना पराभूत करण्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे मनसुबे धुळीला मिळाले. खडसे यांना तब्बल 29 मते मिळाली. राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्यापेक्षा 3 मते जास्त आहेत. यामुळे खडसेंनीच भाजपची मते घेतली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देवून मैदानात उतरवला. पाचव्या उमेदवारासाठी खरी लढत कॉंग्रेस व भाजपत होती. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा खरा निशाना एकनाथराव खडसे होते. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे. फडणवीस यांचे विश्‍वासू महाजन आहेत. त्यातच खडसे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व महाजनांनाही नको आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विजय होऊ नये, म्हणून सर्व प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आले. आगामी काळात भाजपला खडसे अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजप आणि महाजन खडसे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 45 वर्षाचा राजकीय अनुभव या ताकदीवर खडसे आपला विजय संपादन केला.

खडसे यांना सर्वाधिक मते

एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये कुंचबना करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीची वाट धरली. राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसे यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यांवर टीका केली. या दोघांनीही खडसे यांचे खच्चीकरण करण्याचे एकही संधी सोडली नाही. खडसे यांच्या मागे ईडीची चौकशी लावली. त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले. त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली. यामुळे खडसे विरुद्ध महाजन आणि फडणवीस असा सामना नेहमीच राज्यात दिसून आला. आता खडसे यांना पराभूत करण्याची रणनीती आखण्यात आली होती. पक्षाला पाच जागा मिळवून देण्यात फडणवीस यांना यश आले तरी खडसे यांचा पराभव करण्याचे त्याचे मनसुबे धुळीला मिळाले आहे.

आता खडसेंना मंत्रीपद मिळणार

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या साथीने राज्यात भाजप वाढवली. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे महत्व वाढल्यानंतर पक्षातील खडसे यांचे स्थान कमी होऊ लागले. पक्षात राहून खडसे यांना चेकमेट केले जात होते. यामुळे ज्या पक्षाला खडसे यांनी ४० वर्ष वाढवली, त्या पक्षातून ते बाहेर पडले. भाजप सोडतांना आमदारकी आणि मंत्रीपदाचे आश्वासन त्यांना देण्यात आल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. त्यासाठी राज्यपाल नियुक्त कोट्यातून खडसे यांना आमदारकी दिली जाणार होती. राज्यपालांनी ही नावे अजूनही मंजूर केली नाही. आता विधान परिषदेतून जाऊन खडसे मंत्री होणार का? हा प्रश्न आहे.

अतिरिक्त मिळालेली मते भाजपची-खडसे

राष्ट्रवादीकडे ५१ मते आहेत. परंतु राष्ट्रवादीला ५५ मते मिळाली. राष्ट्रवादीला चार मते जास्त मिळाली. यासंदर्भात माध्यमांशी बोलतांना खडसे यांनी सांगितले की, जास्त मिळालेली मते ही भाजपमधील मित्रांची आहे. मला रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न झाले. परंतु काही अपक्ष आणि काही मित्रांनी मदत केली.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...