राजकारण

Raj Thackeray: महायुतीच्या प्रचारसभेला जाणार का? राज ठाकरे म्हणाले...

Published by : Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे. त्याचे विश्लेषण मी त्यादिवशीच्या सभेमध्ये केलेलं आहे.

पहिल्या 5 वर्षातल्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याबाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला. अनेकवेळा लोक सांगतात की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. प्रश्न 2014च्या आधीची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटते की मला भूमिका बदलणं आवश्यक होते असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महायुतीच्या प्रचारसभेला जाणार का? यावर राज ठाकरे उत्तर देत म्हणाले की, मी अजून ठरवलेलं नाही की कुठे घ्यायच्या आणि काय घ्यायच्या. पुढे बघू. माझी चर्चा झाल्यावर मी सांगेन.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य