death incident | madhya pradesh team lokshahi
ताज्या बातम्या

खाजगी रुग्णालयात भीषण आग, 10 जणांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Published by : Team Lokshahi

fire news : मध्य प्रदेशातील एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागली आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही बाहेर काढण्यात येत आहे. (madhya pradesh massive fire breaks out private hospital jabalpur people death incident)

हॉस्पिटलला लागलेली आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या गाड्यांना त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यानंतर वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन कापले. यानंतर सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

या घटनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे वक्तव्यही आले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, जबलपूर येथील रुग्णालयात भीषण आग दुर्घटनेची दुःखद बातमी मिळाली आहे. मी स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्या सतत संपर्कात आहे. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत. मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा