ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय,संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

Published by : shweta walge

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ व दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेमध्ये सांगली जिल्हयातील पाटील मंजूनाथ गोपाळ हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीतून हिंगोली जिल्हयातील पायघन ओमेश किसन प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्हयातील श्रीमती पाचंगे अंकिता सुरेश ह्या प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना