Shocking Video|Viral Video team lokshahi
ताज्या बातम्या

बाईक अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

बोलेरो जेसीबीला धडकली त्यामुळे व्यक्तीचा जीव वाचला

Published by : Shubham Tate

रस्त्यावर बेधुंद वेगाने गाडी चालवणाऱ्यांपासून नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण अशा प्रकारे आपला जीव जाण्याचा धोका असतो. वाहने कमी वेगाने चालवावीत, असा सल्ला नेहमीच दिला जातो, परंतु काही लोक स्वत:ला 'वेगाचे बॉस' समजतात आणि विमान उडवल्याप्रमाणे वाहने घेऊन रस्त्यावर निघतात. असे लोक अपघाताला बळी पडतात आणि आपला जीव गमावतात. काही वेळा तर अशा वाहनचालकांमुळे इतरांनाही आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येते. रस्ते अपघातांशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आजकाल असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. (man survived from collision between jcb and bolero shocking video viral on social media)

व्हिडिओमध्ये बाईक चालवणारा एक व्यक्ती थोडक्यात वाचल्याचे दिसत आहे. हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून त्याच्या बाईकवर आराम करत असताना एक वेगवान जेसीबी अनियंत्रितपणे त्याच्या दिशेने येतो. आणि अशातच पलीकडून येणारी बोलेरो जेसीबीला धडकली, त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला, अन्यथा हा अपघात ज्या प्रकारे झाला, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता किंवा तो गंभीर जखमी झाला असता. पण तो वाचणार हे त्याच्या नशिबात लिहिलं होतं, म्हणून तो वाचला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा नक्कीच थरकाप उडेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा