लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाची चर्चा जोरदार होत आहे. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनकथेवर आधारित हा चित्रपट आहे. येत्या १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटाच्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटातील 'आया रे तुफान' हे गाण नुकतच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे.
ऑस्कर विंनीग संगीतकार ए. आर. रहमान यांनी चित्रपटामधल्या गाण्यांची जबाबदारी घेतली आहे. 'आया रे तुफान' हे गाण मराठी गायिका वैशाली सांमत हिने गायलं आहे. या गाण्यामध्ये महत्त्वाचे योगदान म्हणजे 'क्षितीज पटवर्धन' याने हे गाणं लिहीले आहे. क्षितीज यांने एक पोस्ट केली, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये क्षितीज हा संगीतकार ए. आर. रहमान यांचे आभार मानत आहे.
काय आहे, क्षितीजची पोस्ट
'छावा' च्या 'आया रे तूफान' च्या निमित्ताने...
आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मला "माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं" गाण्याला मिळत असलेल्या प्रेमानं येत असतानाच, छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणार गाणं लिहायची जबाबदारी आली आणि वाटलं आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा करता आली.
ए. आर. रहमान सर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, निर्माते दिनेश विजन सर, हे गाणं ज्यांच्या सोबत लिहायचं भाग्य लाभलं ते इर्शाद कामिल सर, या सगळ्यांचा आजन्म ऋणी आहे. आपली लाडकी गायिका वैशाली सामंत हिने हे गाणं गायलं आहे.
'छावा' मराठी मातीने देशाला दिलेली आणखी एक अनमोल देणगी ठरावी, ह्या सदिच्छेसह गाणं सादर करतोय "आया रे तूफान!"
"भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तूफान! एक आंख में पानी, एक में अरमान, आया आया आया रे तूफान !" -क्षितिज
क्षितीज पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
कोण- कोण आहेत छावा चित्रपटातील कलाकार
रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे आणि दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे