टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज इंग्लंड दौऱ्यातील एडबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आक्रमक गोलंदाजी करताना दिसला. मोहम्मद सिराजने इंग्लंड दौऱ्यादरम्यान 2 बॉलमध्ये जो रूट आणि बेन स्टोक्स या मुख्य फलंदाजांची विकेट्स घेत भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. मागील काही दिवसांत मोहम्मद सिराजची गोलंदाजी तितकी आक्रमक पाहायला मिळाली नाही मात्र तिसऱ्या दिवशी त्याने घेतलेल्या 2 विकेट टीम इंडियासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
टीम इंडियाने सामन्यावर जोर धरत इंग्लंडचा अर्धा संघ 85 धावांवर माघारी पाठवला. सिराजने पहिला विकेट तिसऱ्या बॉलवर घेत, जो रुटला लेग साईडच्या दिशेला जाणाऱ्या बॉलसह आऊट केले. यावेळी टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतने कॅच पकडला आणि जो रुटला 22 धावांवर बाद केला. त्यानंतर कॅप्टन बेन स्टोक्सला सिराजने पहिल्याच बॉलवर पंतच्या हाती कॅच आऊट केलं.
अशाप्रकारे मोहम्मद सिराजने घेतलेल्या या दोन विकेट भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहे. असचं काहीस दुसऱ्या दिवशी आकाश दीपने घेतलेल्या विकेटमुळे झाल्याचं पाहायला मिळालं. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आकाश दीपने शानदार कामगिरी करत आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेले. डावाच्या तिसऱ्या षटकात सलग दोन चेंडूवर इंग्लंडच्या बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाद करत आकाशने इंग्लंडचा फडशा पाडला.