मध्य रेल्वेतील दिवा - मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात 6 जणांनी आपला जीव गमावला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सणसणीत टीका केली आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, "देशातील रेल्वेचा कारभार हा दिखाऊ कारभार सुरू आहे. रेल्वे मंत्री हे रील मंत्री झाले आहेत. रोज एक रील काढायचा, काहीतरी बोलायचं. खरतंच मध्य रेल्वेची घटना ऐकून मला इतक्या वेदना झाल्या आहेत. जी मुलं या दुर्घटनेत दगावली आहेत, ती सर्व तरुण मुलं आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा येथून मोठ्या प्रमाणात तरुण मुलं रोजगारासाठी मुंबईच्या दिशेने येतात. त्या दिवा स्थानकातून लोकल सुरू करा, असं टाहो फोडून तेथील स्थानिक मागणी करत आहेत. दिवा, मुंब्रा, कळवा या ठिकाणी रेल्वे लोकल प्रवाशांनी भरून जाते. ही मुलं दारात उभी असतात, स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करतात. अपघातात 6 तरुणांचा मृत्यू झाला, ते मंत्री कायम तुम्हाला हसताना दिसतील. त्यांच्या कारकिर्दीत जितके अपघात झाले, रेल्वे मंत्र्यांनी काहीतरी वेगळं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. आधी त्या रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्या. दिवा स्थानकातून लोकल सुरू करा, त्यांचे प्राण गेले त्यांना मदत करा."
हेही वाचा