Bollywood News : अभिनेत्रीला मोठा धक्का! पर्सनल सेक्रेटरीला अफरातफरीच्या आरोपाखाली अटक  Bollywood News : अभिनेत्रीला मोठा धक्का! पर्सनल सेक्रेटरीला अफरातफरीच्या आरोपाखाली अटक
ताज्या बातम्या

Bollywood Crime News : अभिनेत्रीला मोठा धक्का! पर्सनल सेक्रेटरीला अफरातफरीच्या आरोपाखाली अटक

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट हिची पर्सनल सेक्रेटरी 32 वर्षीय वेदिका प्रकाश शेट्टी हिला अटक करण्यात आली आहे. दोन वर्ष आलिया भट्टच्या पर्सनल सेक्रेटरी पदावर असताना तब्बल 77 लाखांचा घोटाळा केला.

Published by : Riddhi Vanne

While Serving as Alia Bhatt's Personal Secretary For Two Years, He Committed A Scam Worth Rs 77 lakh. : प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट हिची पर्सनल सेक्रेटरी 32 वर्षीय वेदिका प्रकाश शेट्टी हिला अटक करण्यात आली आहे. दोन वर्ष आलियाच्या पर्सनल सेक्रेटरी पदावर असताना तब्बल 77 लाखांचा घोटाळा केल्यामुळे आलियाच्या आईनेच तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अखेर पोलिसांनी तिला बंगळूरमधून अटक केली असून तिच्यावर पैशांचा घोटाळा केल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2021 मध्ये वेदिका शेट्टी आलिया भट्टची पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहत होती. वेदिका शेट्टी ही अंधेरीच्या मरोळ परिसरामध्ये राहत होती. त्यावेळेस बनावट बिलांच्या आधारे प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक तिने खात्यातून 77 लाख रुपयांची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे याचा थांगपत्ता तिने कोणाला लागू दिला नव्हता. आलिया भट्ट हिच्या वैयक्तिक आयुष्याची आणि प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी या सेक्रेटरीला देण्यात आली होती. याचवेळी तिने हुशारीने प्रॉडक्शन हाऊस आणि आलिया भट्ट हिच्या पर्सनल अकाउंटमधून सुमारे 76,90,892 रुपयांची अफ़रातफतर केली.

मे 2022 ते ऑगस्ट 2024 या दोन वर्षांच्या काळात तिने हा घोटाळा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा आलिया भट्ट च्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. तात्काळ याप्रकरणी आलिया भट्टची आई अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सोनी राजदान हिने जानेवारीमध्ये वेदिका शेट्टीविरोधात जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. 5 महिन्यापासून पोलीस तिचा शोध घेत होते.अखेर 5 महिन्यांनंतर वेदिका शेट्टी हिला बंगळुरू मधून अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध सुश्री भट्ट यांची निर्मिती कंपनी, इटरनल सनशाईन प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, आणि वैयक्तिक खात्यामधून पैसे काढल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

बेंगळुरूमधून 5 दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर पोलिसांनी तिला आणलं असून तिला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आलिया भट्टच्या आईने याबबाबत रीतसर तक्रार केल्यांनतर आलिया भट्टच्या पीए वेदिका शेट्टी हिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूमध्ये एकच खळबळ माजली आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप; 375 गावांमध्ये 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम राबवला

OnePlus Nord 5 : वनप्लसची नवी उत्पादने जागतिक बाजारपेठेत दाखल; स्मार्टफोनसह इअरबड्स, टॅबलेट, पॅड आणि स्मार्ट वॉच लाँच

Dhurandhar Film : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटात ‘राहुल गांधी’ नाव पाहून गोंधळ; जाणून 'घ्या' Fact Check

Teachers Protest : अधिवेशन संपेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा होणार इतका पगार; गिरीश महाजन यांनी दिले आश्वासन