ताज्या बातम्या

नमो महारोजगार मेळावा; खुर्च्यांवर वंचित बहुजन आघाडीचे स्टिकर

बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विकास कोकरे, बारामती

बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे. या महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. बारामती येथे राज्य शासनाच्या वतीने नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी जवळपास पंधरा हजार खुर्च्यांची व्यवस्था या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे. मात्र या खुर्च्यावरील स्टिकर हे चर्चेचा विषयच ठरतं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे स्टिकर खुर्च्यांवर लागलेले पाहायला मिळाले. मात्र तात्काळ काही कर्मचाऱ्यांकडून हे स्टिकर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार या नमो मा रोजगार मेळाव्यातील व्यवस्थापनाचे नियोजन एकाच ठेकेदाराकडे दिले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र तात्काळ हे स्टिकर काढणे सुरू झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी

Pune Bhide Bridge : पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

iPhone 17 : Apple ने नव्या फीचर्ससह लाँच केला आयफोन 17

Accident : अटल सेतूवर भीषण अपघात; एका व्यक्तीचा जागीच मृत्यू