ताज्या बातम्या

"संजय राऊतांनी मला उद्धव-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगितलं ते मी सांगितले तर त्यांना चपलाने मारतील - नारायण राणे

शिवसेना नेते संजय राऊत व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शाब्दिक वाद रंगला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शाब्दिक वाद रंगला आहे. राऊतांचा परत तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असे नारायण राणेंनी म्हणताच संजय राऊतांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. याच पार्श्वभूमीवर आता परत नारायण राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. हा व्यक्ती मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा.असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका,” असे ते म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, “मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत. मी संपूर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही. संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलाने मारलं नाही, तर मला विचारा,” एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे.” असे म्हणत राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा