ताज्या बातम्या

नाशिक परिमंडळातील साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा

Published by : Siddhi Naringrekar

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आजापासून संपावर आहेत. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. काल मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपात नाशिक परिमंडळातील साडे तीन हजार कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा दिला असून नाशिककरांसाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

नाशिकमधील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435, 1800-233-3435 , 1912 आणि 19120 यावर संपर्क साधावा. यासोबतच नाशिक मंडळातील ग्राहकांनी 7875357861 या क्रमांकावर तसेच मालेगाव मंडळातील ग्राहकांनी 7875653952 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आला आहे.

वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली असून हे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा