ताज्या बातम्या

नाशिक खासगी बस आणि टँकर अपघात; मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा

Published by : Siddhi Naringrekar

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तब्बल 10 ते 12 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत जळाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नेतावाईकाला दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर केली आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नाशिक येथील बस दुर्घटनेबद्दल ऐकून वाईट वाटलं. ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,” तसेच, पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नेतावाईकाला दोन लाखांची मदत केली जाईल तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील, असंही जाहीर करण्यात आलं आहे.

“नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी ट्विट केलं आहे.

वंचितच्या रमेश बारसकर यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले...

Tanaji Sawant : आमचा महायुतीचा उमेदवार 2 लाख मतांनी निवडणूक येणार

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर