लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील तसेच बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे, वर्धेतून अमर काळे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.