नवी मुंबईत एका परप्रांतीय महिलेनं मराठी कुटुंबावर अरेरावी केल्याचा प्रकार घडला आहे. पनवेलच्या भोकरपाडातील हिरानंदानी सोसाटीत ही घटना घडली आहे. यावेळी महिलेनं घर सोडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मराठी कुटुंबानं केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनसेनं महिलेला विचारला जाब विचारला आहे. तर सोसायटीच्या चेअरमन वसुंधरा शर्मा ह्या महिलेनं माफी मागितली आहे.
पनवेल मधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत भाडोत्री कुंटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोप गायकवाड कुटुंबाने केलाय. इथे हे कुटुंब भाड्याने राहत होतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ते दुसऱ्या रुमची शोधाशोध करत असल्याने त्यांनी त्या संदर्भात घर मालकाला कळवलं होतं. त्यांच मुल लहान असल्याने घरमालकाने त्यांना रहाण्याची पवरानगी दिली होती.
तरीही या सोसयाटीच्या महिला चेअरमन कडून रुम सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला गेला आहे. शिवाय भांडण करुन मराठी माणसांची इथे राहण्याची लायकी नाही असं म्हणत शिविगाळ केली गेल्याचं गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे, या वादात गायकवाड यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्यांने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
या घटनेची माहिती मिळताच मनसेने जाब विचारला, मनेसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष अदिती सोनार आणि मनसेचे कार्यकर्ते तिथे पोहचल्यावर त्यांनी मराठी माणसांवर होत असलेल्या अरेरावीचा जाब विचारला, त्यानंतर सोसायटीतल्या इतर मराठी रहिव्याश्यांनीही याच स्वरुपाच्या तक्रारी केल्यात. त्यानंतर वसुंधरा शर्मा चेअरमन ह्या महिलेने माफी मागितल्याच समोर आलं आहे.