Navjyot Singh Sidhu
Navjyot Singh Sidhu Team Lokshahi
ताज्या बातम्या

Navjot Singh Sidhu यांना एक वर्षाचा तुरुंगवास; रस्त्यावर भांडण करणं भोवलं

Published by : Sudhir Kakde

Navjot Singh Sindhu : सुमारे 34 वर्षांपूर्वी घडलेल्या एका रस्त्यावरील वादाच्या प्रकरणात काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी या प्रकरणात त्यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. 1988 च्या रस्त्यावर झालेल्या एका वादात सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना या प्रकरणी ही शिक्षा सुनावल्याने सिद्धूंना आता एक वर्ष तुरुंगात काढावं लागणार आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने याआधी सिद्धूंना हत्येप्रकरणी दोषी असलेल्या सिद्धूंना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, तर सुप्रीम कोर्टाने त्यांना याच प्रकरणात निर्दोष ठरवत, दुखापतीसाठी 1,000 रुपये दंड ठोठावला होता. (Navjyot Singh Sidhu sentenced one year jail for road rage case of 1988)

सप्टेंबर 1999 मध्ये याच प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धू यांची खालच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती, परंतु डिसेंबर 2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि अन्य एकाला दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दोन्ही आरोपींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर हायकोर्टाने सिद्धूला मारहाण प्रकरणी दोषी ठरवून हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. याच प्रकरणात पीडित पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...