Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून स्लीपर सेल उभारण्याचा प्रयत्न" रोहित पवारांचा भाजपला टोला  Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून स्लीपर सेल उभारण्याचा प्रयत्न" रोहित पवारांचा भाजपला टोला
ताज्या बातम्या

Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून..." रोहित पवारांचा भाजपला टोला

रोहित पवार आरोप: परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून स्लीपर सेल उभारण्याचा भाजपचा डाव.

Published by : Team Lokshahi

Rohit Pawar's Allegation : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परप्रांतीय शिक्षक भरतीवरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, "20,000 परप्रांतीय शिक्षकांची भरती करून भाजप महाराष्ट्रात आणखी एक स्लीपर सेल उभारण्याचा डाव आखत आहे. हे शिक्षक गावागावांत जाऊन मराठी भाषेविषयी द्वेष पसरवतील आणि दिल्लीमधून महाराष्ट्रावर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे."

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, "दहशतवाद्यांची तुलना मराठी माणसांशी करणे आम्ही सहन करणार नाही. अशिष शेलार यांच्या विधानाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या कोणत्याही कृतीला जनता उत्तर देईल. महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा बनाव तयार केला जात आहे. हे सर्व एक योजनाबद्ध राजकीय षड्यंत्र आहे. मी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन करतो की, कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या प्रभावाखाली न जाता वास्तव समजून घ्यावे आणि पुढील राजकीय निर्णय घ्यावा." रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर