ताज्या बातम्या

Nepal PM KP Sharma Oli : मोठी बातमी! नेपाळचे पंतप्रधान यांनी दिला राजीनामा

नेपाळमध्ये सोशल मीडियावर सरकारने घातलेल्या बंदीविरुद्ध युवाशक्ती काल रस्त्यावर उतरली होती. प्रचंड आक्रमक झालेल्या युवकांनी संसदेवर हल्ला करून जाळपोळ-तोडफोड सुरू केली.

Published by : Prachi Nate

थोडक्यात

  • नेपाळचे पंतप्रधानांनी दिला राजीनामा

  • देश सोडून दुबईला जाणार ?,

  • उपपंतप्रधानांसह 10 मंत्र्यांचे राजीनामे

  • नेपाळच्या संसदेला लागली आग

नेपाळमध्ये सोशल मीडियावर सरकारने घातलेल्या बंदीविरुद्ध युवाशक्ती सोमवारी रस्त्यावर उतरली. यावेळी लष्कराने केलेल्या गोळीबारात 20 युवकांचे जीव गेले, तर 400 हून अधिक जण जखमी झाले. राजधानी काठमांडूसह 7 शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, कोणी दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. संसद भवन, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

दुसरीकडे, Gen Z च्या आंदोलनाला नेपाळचे पंतप्रधान घाबरले असल्याचं समोर आलं आहे. कारण नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. ते देश सोडून दुबईला जाणार असल्याच्या चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. दरम्यान नेपाळमध्ये आतापर्यंत उपपंतप्रधानांसह 10 ते 11 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रचंड आक्रमक झालेल्या 12 हजारांहून अधिक युवकांनी संसदेवर हल्ला करून नेपाळच्या संसदेला आग लावत जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू केल्यानंतर, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर 26हून अधिक अॅप्सवर बंदी घातली. नेपाळमध्ये सोशल मीडियावर सरकारने घातलेल्या बंदीविरुद्ध युवाशक्ती काल रस्त्यावर उतरली होती. सोशल मीडिया साइट्सवरील बंदीविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करताना निदर्शक पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढले. नेपाळमध्ये आंदोलनादरम्यान कालपर्यंत 19 जणांचा मृत्यू, 250 हून अधिकजण जखमी झाले. दरम्यान, सध्या संसद भवन, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nepal EX PM Wife Dies : नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला! माजी पंतप्रधानांच्या पत्नीची जिवंत जाळून हत्या, या घटनेत झालानाथ खनाल...

Vice-Presidential Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर! सी.पी , राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

Latest Marathi News Update live : एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन 17वे उपराष्ट्रपती

Nepal Finance Minister Beaten By Protesters : नेपाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण! अर्थमंत्र्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video Viral