महाराष्ट्र विधासभा निवडणुकीचा निकाल लागून ११ दिवस उलटले. अखेरीस आज महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तस्थापनेचा दावा करण्यात आला आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे समर्थनाचे पत्र सुपुर्द केलं आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनामध्ये राज्यपालांकडे सत्तास्थापनेचं पत्र सुपुर्द केलं आहे.
राज्यामध्ये २०१९ पासून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकहाती सत्ता मिळाली तरीही अद्याप सत्तास्थापनेचा दावा का केला जात नाही, याबाबत शंका कुशंका उपस्थित केली जाऊ लागली. मात्र, आज या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीने राज्यभवनावर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेची परवानगी मागितली. त्यानंतर राज्यपालांनी महायुतीला सत्तास्थापनेची परवानगी दिली आहे. आझाद मैदानावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी होणार आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
अडीच वर्षांपूर्वी आपण मुख्यमंत्री व्हावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नावाची शिफारस केली होती ती आठवण काढत कोपरखळ्या लगावल्या आहेत. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून पाठिंब्याचे पत्र शिवसेने दिलं असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असेल. आपण याआधीच पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या दैदिप्यमान विजयाबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. आपल्याला काय मिळालं यापेक्षा सर्व सामान्य जनतेला काय मिळालं हे आमचं ध्येय होतं. महाविकास आघाडीने रखडवलेले प्रकल्प तात्काळ महायुतीने मार्गी लावले. एजन्सीचे अंदाज फोल ठरवले.
सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा दादांना चांगला अनुभव असल्याची कोपरखळी त्यांनी यावेळी लगावली आहे.
महायुतीची राजभवनातील संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा-