देशातील सराफा बाजारात पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 3 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 97,786 रुपये इतका पोहोचला आहे. यामध्ये 3 टक्के जीएसटी धरल्यास दर 1,00,719 रुपये प्रति तोळा झाला आहे. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा एक लाखांच्या पातळीवर गेले आहेत.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर 89,572 रुपये प्रति तोळा झाला आहे. यामध्ये जीएसटी धरल्यास हा दर 92,259 रुपये इतका होतो. तसेच 23 कॅरेट सोन्याचा दर 97,394 रुपये प्रति तोळा इतका आहे.
तसेच, 18 कॅरेट सोन्याचा दर 230 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 73,340 रुपये झाला आहे. जीएसटीसह हा दर 75,540 रुपये इतका आहे. 14 कॅरेट सोन्याचा दरही 179 रुपयांनी वाढून 57,205 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला असून, जीएसटीसह हा दर 58,921रुपये झाला आहे. हे दर मेकिंग चार्जेस वगळता आहेत.
चांदीच्या दरातही वाढ झाली असून, आज चांदी 1,060 रुपयांनी वाढून प्रति किलो 1,10,980 रुपये झाली आहे.
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याचे दर तब्बल 22,046 रुपयांनी आणि चांदीचे दर 21,731 रुपयांनी वाढले आहेत. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 76,045 रुपये होता. तर चांदीचा दर 85,680 रुपये प्रति किलो इतका होता.
तज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे सोन्याचे दर उच्च पातळीवर टिकून आहेत.
हेही वाचा