Aditya Thackeray On Mahayuti : विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारमधील तिघांची तोंडं तीन वेगवेगळ्या दिशांना आहेत. राज्यकारभाराचा समन्वयच हरवला असून जनतेचे प्रश्न बाजूला पडले आहेत.
पुढे अदित्य ठाकरे म्हणाले की, "चहा पानाला जाणे म्हणजे पाप आहेच. ज्या पद्धतीने महायुती सरकार आहे. भाजपमध्ये एक पक्ष आणि दोन गद्दार गॅंग आहेत. एकामेकांमध्ये सध्या वाद सुरु आहेत. त्यामुळे तीन पक्षांच्या नेत्यांची तोंड तीन दिशेला आहेत. भाजपने अनेक भ्रष्ट लोंकाना सरकारने सोबत घेतले आहे. त्यामुळे 'डाग अच्छे है' ही भाजपची टॅग लाइन आहे. भष्ट्रनाथ शिंदेना वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायला लागली पाहिजे. महायुतीतील अनेक मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी ही आमची मागणी आहे. भुमरे यांच्या चालक यांच्याकडे अमाप संपत्ती आली कुठून? हे सर्व मुद्धे आम्ही सभागृहात मांडणार आहोत. ऱ्यांच्यावर मुख्यमंत्री यांनी कारवाई करावी ही आमची मागणी आहे. भुमरे यांच्या चालक यांच्याकडे अमाप संपत्ती आली कुठून? हे सर्व मुद्धे आम्ही सभागृहात मांडणार आहोत."
हेही वाचा..