Pakistan Flood | Balochistan | Flood  team lokshahi
ताज्या बातम्या

Pakistan Flood : बलुचिस्तानच्या पुरात 127 लोकांचा मृत्यू, मुसळधार पावसामुळे घरे उद्ध्वस्त

काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ?

Published by : Team Lokshahi

Balochistan Flood : बलुचिस्तानमध्ये सात धरणे फुटली असून 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुरामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. बलुचिस्तानमधील पुरामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे जनतेचेही आर्थिक नुकसान झाले असून ते कमी करण्यासाठी अनेकजण उरलेल्या वस्तू घेण्यासाठी घराजवळ पोहोचत आहेत. अचानक आलेल्या या पुरामुळे हेलिकॉप्टर आणि बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. (pakistan flood heavy rains in balochistan 127 people died)

पाकिस्तान एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की सैन्य बचाव कार्य, वैद्यकीय शिबिरे उभारणे आणि खराब झालेल्या दळणवळण सेवा दुरुस्त करण्यात गुंतले आहे. यासोबतच तयार केलेले अन्नही लोकांना दिले जात आहे.

पुरामुळे किती नुकसान झाले?

एआरवाय न्यूजने पीडीएमएचने म्हटले आहे की, बलुचिस्तानमधील सात धरणे फुटली आणि पूर आला. बलुचिस्तानमध्येच पुरामुळे १२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पूल आणि महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी पूरग्रस्त बलुचिस्तानला भेट दिली. याबाबत माहिती देताना पंतप्रधान शाहबाद शरीफ यांनी ट्विट करून नुकसान भरपाईची घोषणा केली. पुरात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये दिले जात आहेत आणि विस्थापित लोकांसाठी आर्थिक मदत वाढवत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू