ताज्या बातम्या

पनवेल शहर जिल्हा काँग्रेसची गाडी रुळावर; प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रात पक्षसंघटना मजबूत व्हावी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासंबंधीत कार्यक्रमांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार भेट देण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक लहानमोठ्या वाड्या वस्त्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

हर्षल भदाणे पाटील ,पनवेल

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रात पक्षसंघटना मजबूत व्हावी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासंबंधीत कार्यक्रमांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार भेट देण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक लहानमोठ्या वाड्या वस्त्या आहेत. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सभेला, कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नाही. अशावेळी पक्षातील जेष्ठ नागरिक, महिला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जेष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, प्रताप गावंड व पनवेल युवक अध्यक्ष राकेश यादव उपस्थित होते.

मागील काही काळापासून अडथळ्यांची शर्यत पार करत मार्गक्रमण करणाऱ्या पनवेल शहर जिल्हा काँग्रेसने पुन्हा एकदा पनवेलच्या राजकारणात कमबॅक केले आहे. पनवेल शहर जिल्हा काँग्रेसची सूत्रे नुकतीच अभिजित पां पाटील यांनी हाती घेताच विविध उपक्रम राबविले जात आहेत. काँग्रेस पक्षाला पनवेलमध्ये गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची भक्कम मोट बांधण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 'अभी हम जिंदा है' असे म्हणत पनवेल काँग्रेस आता आक्रमक भूमिकेत देखील पहायला मिळत आहे. त्यामुळे 'पनवेलची काँग्रेस संपली' अशी टीका करणाऱ्यांना वेळ आल्यावर जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा पलटवार पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केला आहे.

मुंबईतील दादर येथील टिळक भवन येथे वाहन स्विकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिजीत पाटील म्हणाले, खरेतर हा आनंदाचा क्षण आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीला एक नवीकोरी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी भेट दिली होती. त्यावेळी ही गाडी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आम्ही उपस्थित होतो. आज हीच गाडी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पनवेल काँग्रेसला पुन्हा सुपूर्द करण्यात आली. यामुळे पनवेल काँग्रेसला निश्चितपणे या वाहनाचा उपयोग होईल अशी खात्री आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा