Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshah
ताज्या बातम्या

संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार? नेमके काय आहे पत्राचाळ प्रकरण?

Published by : Team Lokshahi

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात राऊत यांची चौकशी सुरू आहे.

काय आहे पत्रा चाळ प्रकरण?

पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

Daily Horoscope 12 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे आर्थिक समस्या दूर होतील; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 12 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"कौरवांच्या विरोधात आमची पांडव सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरले" पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

GT vs CSK : शुबमन गिलच्या नावावर 'या' जबरदस्त विक्रमाची नोंद, अहमदाबादच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस

"आम्ही पक्ष फोडत नाहीत, घरही फोडत नाहीत, पण..." पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं