जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) च्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पीएम-किसानचा 20 वा हप्ता पुढील काही दिवसांत जारी केला जाईल, असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता जारी केला होता. ज्याचा फायदा 2.4 कोटी महिला लाभार्थ्यांसह 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला. यापूर्वी, 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये आणि 17 वा हप्ता जून 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. आता याचा 20 वा हफ्ता कधी येणार, याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम-किसान अंतर्गत, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये वितरित करते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
पंतप्रधान-किसान योजना मोबाईल ॲप 24 फेब्रुवारी 2020 रोजी लाँच करण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत अधिक पारदर्शकता आणि सुविधा पोहोचवण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. पीएम-किसान मोबाईल ॲप हे पीएम-किसान वेब पोर्टलचा एक सोपा आणि कार्यक्षम विस्तार आहे. 2023 मध्ये, हे ॲप अतिरिक्त फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यासह लाँच करण्यात आले.
या अॅपमुळे दुर्गम भागातील शेतकरी ओटीपी किंवा फिंगरप्रिंटशिवाय त्यांचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करू शकले. पोर्टल, मोबाइल अॅप स्व-नोंदणी, लाभ स्थिती ट्रॅकिंग, फेशियल ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी सारख्या सेवा प्रदान करते. दुर्गम भागातील शेतकरी त्यांचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. नोंदणी सुलभ करण्यासाठी आणि अनिवार्य आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 5 लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) जोडण्यात आली आहेत.
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी टपाल विभाग आधारशी मोबाईल क्रमांक लिंक, अपडेट करण्याची सुविधा प्रदान करतो. योजनेत नावनोंदणीसाठी काही अनिवार्य तपशील आवश्यक आहेत. लाभार्थीचे नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक, आयएफएससी, एमआयसीआर कोड, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक याशिवाय पासबुकमध्ये उपलब्ध असलेली इतर माहिती आवश्यक आहे.
हेही वाचा