पुण्यातील रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांची रात्री साडेतीन वाजता छापा मारल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारीमध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करून याप्रकरणी मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु #हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेसाहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे.
हेही वाचा