ताज्या बातम्या

पतंजलीच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये पॉर्न व्हिडीओ सुरु झाला अन् पुढे...

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात सुरु असलेल्या पतंजलीच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतंजली योगपीठशी संबंधित असलेल्या आरोग्य संशोधन केंद्राची एक ऑनलाईन मीटिंग सुरु होती. या बैठकीत अचानक पॉर्न व्हिडिओ सुरु झाला.

एका व्यक्तीनं पॉर्न व्हिडीओ सुरू केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पतंजलीचं योगपीठाचं मुख्य केंद्र असलेल्या हरिद्वारच्या बहादराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पतंजलीशी निगडित असलेल्या कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार दाखल केली आहे.

देश विदेशातील अनेक डॉक्टर्स आणि संशोधकांच्या उपस्थितीत मीटिंग सुरु होती. आरोग्य संशोधन विभागाची बैठक असल्याने फक्त भारतातील नाही तर इतर देशातील मोठमोठे लोक या बैठकीत उपस्थित होते. या प्रकरणी पुण्याच्या येरवडा येथे असलेल्या एका कॉलेज कॅम्पसमध्ये राहणाऱ्या आकाश नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, पतंजलीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मीटिंगमध्ये पतंजली योगपीठाशी संबंधित चर्चा होते. त्याच दरम्यान पॉर्न व्हिडीओ सुरु केला. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amol Kolhe : कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे

सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव