Pratap Sarnaike, eknath shinde, devendra fadanvis Team Lokshahi
ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारावर प्रताप सरनाईकांचं मोठं विधान; म्हणाले 'तुम्हाला मंत्रीपद...'

थोडी फार संकटं होती ती दूर झाली आहेत. त्यामुळे आता फक्त महाराष्ट्राचा विकास करायचा

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल, असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तसेच शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात, असंही त्यांनी नमूद केलं. मंगळवारी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

प्रताप सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पाळतात. आजपर्यंतचा तसा इतिहास आहे. आम्हाला कोट शिवायला टाकायची गरज नाही. एकनाथ शिंदे आम्हाला कोटासह मंत्रीपद देतील. लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. कालही त्यांनी याबाबत सांगितलं आहे.

थोडी फार संकटं होती ती दूर झाली आहेत. त्यामुळे आता फक्त महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. ते नक्कीच मंत्रीमंडळ विस्तार करतील, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितल आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा