ताज्या बातम्या

राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; कोण मारणार बाजी द्रौपदी मुर्मू का यशवंत सिन्हा

Presidential Election : विधिमंडळात राष्ट्रपतीसाठी मतदान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : देशाचा 15 वा राष्ट्रपती निवडणूक (Presidential election) आज होणार आहे. राष्ट्रपती पदासाठी भाजपा नेतृत्वातील रालोआच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यात लढत होत आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी संसद भवनात दोन्ही सभागृहांतील सदस्य राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतील. उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी १० वाजता ही प्रक्रिया सुरु होईल. सर्व आमदार विधिमंडळात मतदान करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत 25 जुलैला संपत आहे. 21 जुलैला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (यूपीए) माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहेत. द्रौपदी मुर्मू या आधी झारखंडच्या राज्यपाल होत्या.

द्रौपदी मुर्मू यांचा पारडे जड असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. मुर्मू यांना विविध पक्षांना पाठिंबा मिळला आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मुर्मू यांचा विजय झाल्यास आदिवासी समाजाशी संबंधीत असलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती बनतील.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी एनडीएने आतापर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी विरोधकांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात