ताज्या बातम्या

जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Published by : Siddhi Naringrekar

जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आज सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम आहे. भारतात लवकरच नदीतील सर्वात मोठं क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारं जगातील सर्वात मोठं क्रूझ असणार आहे. यात शॉवरसह बाथरूम्स आहे. कन्वर्टेबल बेड्स, फ्रेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म्स, लाईफ वेस्ट आणि स्प्रिंकलर्स यांचा समावेश आहे.

या क्रूझचा प्रवास 13 जानेवारी 2023 रोजी वाराणसीपासून सुरू होईल आणि 1 मार्च रोजी हे क्रूझ दिब्रुगडला पोहोचण्याची शक्यता आहे. वाराणसीतील गंगा नदीवर प्रसिद्ध गंगा आरती करून ही क्रूझ आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 13 जानेवारी, 2023 वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.'एमव्ही गंगा विलास' हे नदीवरील क्रूझ शुक्रवारी वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.

या क्रूझमध्ये 18 आलिशान खोल्या आहेत. क्रूझवर एक आलिशान रेस्टॉरंट्स, स्पा आणि सनडेक देखील आहे. क्रूझच्या मुख्य डेकवर 40 जणांसाठी आसनव्यवस्था असलेलं रेस्टॉरंट आहे. या रेस्टरंट्समध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय पाककृतींसह काही बुफे काउंटर आहेत. वरच्या डेकच्या आऊटडोअर सीटिंगमध्ये रिअल टीक स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबलही आहेत.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल