ताज्या बातम्या

Vaishnavi Hagawane Case : नानासाहेब गायकवाडची 'मायावीनगरी' उघड; रोल्स रॉयल्सपासून ते रेंज रोवरपर्यंत आलिशान गाड्या जप्त

वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून या प्रकरणात दररोज नवे पैलू समोर येत आहेत.

Published by : Team Lokshahi

वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून या प्रकरणात दररोज नवे पैलू समोर येत आहेत. आता आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर खंडणीच्या आरोपांची छाया गडद झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील सावकार नानासाहेब गायकवाड यांनी सुपेकर यांच्यावर कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. मात्र, आता खुद्द गायकवाडच पोलिसांच्या रडारवर आहेत.

नानासाहेब गायकवाड यांच्या 'मायावीनगरी'चा भांडाफोड झाला असून, त्यांनी लोकांकडून लुबाडलेल्या पैशातून आलिशान जीवनशैली उभी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या ताब्यातून पुणे पोलिसांनी एकाहून एक महागड्या आणि आलिशान कार्स जप्त केल्या आहेत. या वाहनांचा थाट पाहून पोलिसही अचंबित झाले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या गाड्या

मर्सिडीज – JH 12 F 4444

रोल्स रॉयस – MH 12 RF 4444

रेंज रोव्हर – JH 10 K 4444

इनडेव्हर – MH 12 TH 4444

पजेरो – MH 12 HB 4444

ऑडी – MH 14 GY 4444

या सर्व वाहनांना एक समान आकर्षक क्रमांक ‘4444’ आहे, जो गायकवाड कुटुंबाची श्रीमंती आणि त्यामागील सत्यता व्यक्त करते.

गायकवाड यांनी नागरिकांच्या जमिनी ताब्यात घेणे, वाढीव व्याजदराने कर्जवाटप यामार्फत मोठी संपत्ती मिळवली. त्याच्या आणि मुलगा गणेश गायकवाड याच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल झाले होते. चार वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोघांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करत कारागृहात पाठवले होते. मात्र मागील दीड महिन्यापासून ते पोलिसांना गुंगारा देत होते.

सध्या या प्रकरणातील तपास गतीमान झाला असून, सुपेकर व गायकवाड या दोघांवरही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. एकीकडे खंडणीचे आरोप, तर दुसरीकडे गायकवाडच्या गुन्हेगारी साम्राज्याचे पडसाद आता ही दोन्ही प्रकरणे अधिकच गूढ होत चालली आहेत.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा