ताज्या बातम्या

कसा झाला ओडिशा रेल्वे अपघात? रेल्वे बोर्डाने सांगितला घटनाक्रम

ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. तीन गाड्यांचा अपघात झाला नसून फक्त कोरोमंडल एक्स्प्रेसचाच अपघात झाला, असे त्यांनी सांगितले.

रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा म्हणाल्या की, बालासोर जिल्ह्यात बहनगा बाजार रेल्वे स्टेशन आहे. ही घटना 2 जून रोजी सायंकाळी 6.55 वाजता घडली. कोरोमंडल एक्सप्रेसचे डब्बे घसरले आणि या स्थानकात उभी असलेली इतर गाड्याही त्याच्या कचाट्यात सापडल्या. त्यावेळी दोन मेल एक्स्प्रेस गाड्या स्टेशनवरून वेगवेगळ्या दिशेने जाणार होत्या. स्थानकावर दोन मुख्य ट्रॅक आहेत, जिथे ट्रेन न थांबता जाते आणि दोन लगतच्या ट्रॅक लूप लाइन म्हणतात, जिथे आपण ट्रेन थांबवतो.

लूप लाईनवर 2 गाड्या उभ्या होत्या, बाकीच्या ट्रॅकवरील नॉन-स्टॉप ट्रेन पुढे जाऊ शकतील म्हणून गाड्या तिथेच थांबवण्यात आल्या. बंगळुरूहून चेन्नईच्या बाजूने यशवंतपूर एक्सप्रेस येत होती. ही ट्रेन कोरोमंडलच्या काही सेकंद आधी येत होती. कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार रेल्वे स्थानकावरून हावडा दिशेहून चेन्नईला जाण्यासाठी येत होती, त्यासाठी सिग्नल हिरवे होते आणि सर्व काही नियोजित होते. ओव्हरस्पीडिंगचा प्रश्नच नव्हता आणि पायलटला सिग्नल हिरवा दिसत होता त्यामुळे त्याला सरळ जावे लागले.

ग्रीन सिग्नलनुसार चालकाला त्याच्या ठरलेल्या स्पीडनुसार न थांबता पुढे जावे लागत असल्याने तो ताशी १२८ किलोमीटर वेगाने जात होता. यशवंत एक्स्प्रेसही ताशी १२६ किमी वेगाने येत होती. ओवरस्पीडिंग करण्याचा प्रश्नच नव्हता, असेही जया वर्मा यांनी सांगितले.

प्राथमिक तपासानुसार आतापर्यंत जी कारणे समोर आली आहेत. सिग्नलिंगमध्ये समस्या आढळून आली असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यांचा तपास पूर्ण होईपर्यंत अधिक काही सांगता येणार नाही. आम्ही रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा सविस्तर अहवाल येण्याची वाट पाहत आहोत. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्येच हा अपघात झाला, तो सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. जास्त गाड्यांची धडक झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. फक्त कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. हे कोणत्या कारणास्तव घडले आहे, याचा शोध घेत आहोत, असेही रेल्वे बोर्डाने म्हंटले आहे.

जया वर्मा म्हणाल्या की, कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन अतिशय सुरक्षित आहे आणि सहसा ती उलटत नाही. परंतु, या प्रकरणात कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला जाऊन धडकली. त्या गाडीच्या इंजिनसह काही डबे मालगाडीवर चढले. ट्रेन पूर्ण वेगात होती. तर मालगाडी खूप वजनदार होती. त्यामुळे मालगाडी जागची हलली नाही. उलट प्रवाशांना घेऊन जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर चढली. या अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे इकडे तिकडे पडले. या गाडीचे दोन डबे बाजूच्या लाईनवर पडले. यामुळे यशवंतपुरा एक्सप्रेसचादेखील अपघात झाला, असेही त्यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?