Admin
ताज्या बातम्या

राज ठाकरे जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणार, महाराजांची भूमिका कोण साकारणार पाहा?

मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. विशेष म्हणजे ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.

यावेळी यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपट बनवला तर कुणाला मुख्य भूमिकेत साकारताना पाहायला आवडेल? असा प्रश्न विचारला.

यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, बायोपिकसाठी त्या प्रकारचं व्यक्तीमत्व लागतं. इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता दिदी यांच्यावर बायोपिक करता येईल. असे ते म्हणाले. तसेच राज ठाकरे यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपण चित्रपट बनवत असल्याचं सांगितले.

यावर अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारला की, शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारेल? यावर राज ठाकरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट असेल. आंतरराष्ट्रीय दर्जावरचेच लोकं या चित्रपटात काम करतील. चित्रपटाचं काम सुरु झालं आहे. लिखाणाचं काम सुरु झालं. हा चित्रपट तीन भागात येईल. असे राज ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?