Ramdas Athawale, Raj Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

राज ठाकरे यांना युतीत घेण्यास रामदास आठवले यांचा विरोध

राज ठाकरेंना युतीला कुठलाच फायदा नसल्याचं त्यांना युतीत घेऊ नाही अशी भूमिका रामदास आठवले यांनी औरंगबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

Published by : Team Lokshahi

सचिन बडे, औरंगाबाद : राज ठाकरेंना युतीला कुठलाच फायदा नसल्याचं त्यांना युतीत घेऊ नाही अशी भूमिका रामदास आठवले यांनी औरंगबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी निळा व हिरवा आणि भगवा रंग वगळून एकच रंग हाती घेतल्याने त्यांचा फायदा युतीला काहीच होणार नसल्याचं ही आठवले यांनी म्हंटल आहे. त्यामुळे येणाऱ्या मुबई आणि राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला रामदास आठवले यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.

दरम्यान राहुल गांधी यांच्या भारत जोडे अभियानावर ही टीका करताना आठवले यांनी 60 वर्षात ज्या काँग्रेस ला भारत जोडता आला नाही, अत्ता राहुल गांधी यांना काय भारत जोडता येणार असा टोला ही आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

मुंबई महानगर पालिकेत आठवले गटाला 15 जागा मिळाव्या आणि उपमहापौर पद द्यावे अशी मागणी ही आठवले यांनी युतीकडे केली आहे. तसेच शिवसेनेवर टीका करत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळं चिन्ह द्यावं. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत निश्चित पणे शिवसेनेला मुंबईतून हद्द पार करणार असल्याची टीका ही रामदास आठवले यांनी केलीय.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक ही लढण्याची प्रतिक्रिया ही त्यांनी या वेळी व्यक्त करत शिर्डी मतदार संघात माझ्या विरुद्ध अप प्रचार करण्यात आल्याने माझा प्रभाव झाला.

वेदांत सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. महाविकास सरकारने केंद्राला या बाबत माहिती देणे गरजेचे होती. मात्र महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याने हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला असल्याची टीका ही आठवले यांनी यावेळी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा