ताज्या बातम्या

संजयजी शेपूट का घालताय? माजी मंत्री रामदास कदम यांचा सवाल

शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला

Published by : Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधत खासदार संजय राऊत यांचा पळपुटा असा उल्लेख करत कर्नाटकात जायच्या भीतीने शेपूट का घालताय, असा सवाल उपस्थित केलाय. कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत घाबरले का, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे रामदास कदम म्हणाले.

खेड तालुक्यातील जामगे येथे आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केलेले हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मला देखील कर्नाटक न्यायालयाने समन्स काढले होते व मी सुद्धा कर्नाटकात जाऊन आलो. सीमाभागातील मराठी लोकांनी माझे तिथे स्वागत केले आणि माझ्या जामिनासाठी तिथल्याच मराठी लोकांनी मला सहकार्य केले.

त्यामुळे संजयजी तुम्ही घाबरू नका आणि मराठी माणूस पळपुटा आहे असा संदेश देऊ नका, तुम्ही कर्नाटकात जा तेथील मराठी लोक तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहतील, असा सल्ला देखील रामदास कदम यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस