ताज्या बातम्या

"आज राणांना भेटतो, एका पंक्तीत बसून जेवणही करू"; बच्चू कडू

मागील काही दिवसांपासून शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांचे एकमेकांवर अनेक टीका, गंभीर आरोप सुरु होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थंडावला होता.

Published by : shweta walge

मागील काही दिवसांपासून शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांचे एकमेकांवर अनेक टीका, गंभीर आरोप सुरु होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थंडावला होता. मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी मेळावा घेत अप्रत्यक्षपणे रवी राणा यांना माफ करत इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आमचा वाद मिटला असल्याचे सांगितले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, आमचा वाद मिटला आहे. नवनीत राणा यांचे आभार मानतो त्यांनी देखील यात आपलं मत मांडल. मला वाद घालायचा नाही. त्यामुळे गोंधळ वाढत चालला आहे. राज्यात देखील गोंधळ निर्माण होत आहे. मी संध्याकाळी रवी राणा यांची भेट घेतो. एका पंक्तीत बसून जेवण करू. मुख्यमंत्री यांना भेटून माझ्या 20 हजार हेक्टर सिंचन खाली येणार आहे, त्या संदर्भात भेटणार आहेत. जिल्ह्याच्या विकासाठी आम्ही दोघे एकत्र येऊ असे देखील ते म्हणाले.

काय आहे बच्चू कडू व रवी राणा यांच्यामधील वाद?

किराणा वाटपावरुन बच्चू कडूंनी रवी राणांवर टीका केली होती. यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन कोट्यवधीचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. यानंतर बच्चू कडू चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत राणांविरूध्द तक्रार नोंदवली होती. अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. तर बच्चू कडूंनीही वाद संपल्याचे जाहीर केले होते.

परंतु, रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंना डिवचले. एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल. तर रवी राणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दम खालला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. ते दम देऊन बोलत बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे, असा इशारा रवी राणांनी कडूंना दिला होता. यावर बच्चू कडूंनी प्रत्युत्तर देत म्हणाले, मी 5,6,7 या तारखेला माझ्या गावी कुरळपुर्णाला आहे. रवी राणा यांनी तलवार घेऊन यावे मी हातात फुल घेऊन तयार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर