deepika padukone team lokshahi
ताज्या बातम्या

"दीपिकाला CAA आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने दिले होते 5 कोटी"

मुसरतच्या विनंतीवरून दीपिका जेएनयूमध्ये आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेली होती

Published by : Team Lokshahi

deepika padukone : दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. रणवीर सिंगने काही काळापूर्वी फोटोशूट केले होते आणि त्यामुळे दीपिका सध्या चर्चेत आहे. दीपिकाला ट्रोल केले जात आहे. यापूर्वी रॉचे माजी अधिकारी एनके सूद यांनीही बॉलिवूडबाबत अनेक मोठे खुलासे केले होते. त्यादरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत ब्रिटिश-पाकिस्तानी उद्योगपती अनिल मुसरत यांच्या ओळखीबद्दल बोलले होते. इतकेच नाही तर अनिल मसरत हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खूप चांगले मित्र आहेत, असे सूद म्हणाले होते. (raw officer nk sood alleges deepika padukone jnu visit)

याशिवाय सूद म्हणाले होते की, अनिल मसरत लंडनला येतो तेव्हा तो आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या लोकांसाठी पार्टी आयोजित करतो. याशिवाय त्याने दीपिका पदुकोणवरही मोठा आरोप केला आहे. सूद म्हणाले होते की अनिल मसरत हा भारतविरोधी कारवायांमध्ये सामील आहे आणि लंडनमध्ये सीएएविरोधातील आंदोलनालाही अनिलने आर्थिक मदत केली होती. यासोबतच त्यांनी धक्कादायक खुलासा करत म्हटले की, दीपिका पदुकोण अनिल मुसरतच्या विनंतीवरून जेएनयूमध्ये सीएएविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये गेली होती.

याची सुरुवात छपाकच्या प्रमोशनदरम्यान झाली. सूद यांनी असाही आरोप केला आहे की दीपिकाला तिथे जाण्यासाठी 5 कोटी रुपये मिळाले ज्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून तपासणी केली जात आहे. सी सोबतच दीपिकाचे आयएसआयचे महासंचालक आसिफ गफूर यांच्याकडून कौतुक झाल्याची आठवणही त्यांनी करून दिली. इतकेच नाही तर अनिल मुसरतच्या मुलीचे लग्न २०१७ मध्ये झाल्याचेही सूद यांनी म्हटले आहे. जिथे बॉलिवूडचे टॉप सेलेब्स पोहोचले होते. या लग्नात रणवीर सिंग, हृतिक रोशन, सोनम कपूर, अनिल कपूर, सुनील शेट्टी आणि करण जोहरसारखे स्टार्स दिसले.

अनिल कपूर अनिल मसरतला 25 वर्षांपासून ओळखतो आणि त्याचे कौटुंबिक संबंधही आहेत. सोनम कपूरच्या लग्नात अनिलही मसरत पोहोचला होता. दीपिकाने तिच्या CAA विरोधात असलेल्या 'छपाक' चित्रपटादरम्यान JNU मधील आंदोलनात भाग घेतला होता. त्याचवेळी तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते आणि आता त्याच गोष्टीमुळे ती आज पुन्हा ट्रोल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा