Government Job Recruitment  team lokshahi
ताज्या बातम्या

Job Recruitment 2022 : B.Sc पास असाल तर सरकारी नोकरीची उत्तम संधी, पगार एक लाखापेक्षा जास्त

या पदांसाठी ३० जून २०२२ पर्यंत अर्ज करू शकता

Published by : Shubham Tate

GPSC Recruitment 2022 : गुजरात लोकसेवा आयोग (GPSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आरोग्य (health) आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरी (government job recruitment) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुजरातमध्ये B.Sc किंवा MSc नर्सिंग करणाऱ्यांसाठी सरकारी नोकऱ्या आहेत. (recruitment of nursing officer posts under the department of health and family welfare on its official website)

गुजरात लोकसेवा आयोग (GPSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत नर्सिंग, गुजरात नर्सिंग सेवा, वर्ग-II च्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ३० जून २०२२ पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2022

प्राथमिक परीक्षा - 11 सप्टेंबर 2022

मुख्य परीक्षा - नोव्हेंबर २०२२

मुलाखत - मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांनी.

नर्सिंग ऑफिसर पगार

नर्सिंग ऑफिसर वर्ग-2 च्या पदांसाठी शेवटी निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-9 (पे मॅट्रिक्स- 53100 - 167800) (ग्रेड पे-5400) नुसार वेतन मिळेल. उमेदवारांकडे M.Sc (नर्सिंग) पदवी किंवा पोस्ट बेसिक B.Sc (नर्सिंग) / बेसिक B.Sc (नर्सिंग) पदवी असावी. तुम्ही कोणत्याही विद्यापीठातून GPSC भर्ती 2022 साठी अर्ज करू शकता.

रिक्त जागा

नर्सिंग ऑफिसर : 34

रिक्त पदांचे तपशील जाणून घ्या

स्वारस्य असलेले उमेदवार GPSC भर्ती 2022 जॉब नोटिफिकेशनसाठी 30 जून 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घेऊ शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा