टाटा मोटर्सनं आपल्या दोन लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV मॉडेल्स, Curvv EV आणि Nexon EV 45kWh साठी आयुष्यभर HV बॅटरी वॉरंटी उपलब्ध करून दिली आहे. याआधी ही सुविधा Harrier EV मॉडेलमध्ये देण्यात आली होती. तसेच ग्राहकांकडून ती अत्यंत सकारात्मक प्रतिसादास पात्र ठरल्यानंतर, आता ती Curvv आणि Nexon या मॉडेल्सवरही लागू करण्यात आली आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यावसायिक प्रमुख विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, "इलेक्ट्रिक वाहनांबाबत ग्राहकांचा विश्वास वाढवणे ही आमची प्राथमिकता असून, EV तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. ग्राहकांना निश्चित मालकी अनुभव मिळावा म्हणून आम्ही या प्रकारची वॉरंटी देत आहोत."
ते पुढे म्हणाले की, "Curvv EV आणि Nexon EV 45kWh साठी ही कायमस्वरूपी बॅटरी वॉरंटी देत आम्ही ग्राहकांना भविष्यासाठी तयार आणि चिंतामुक्त अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत." ही सुविधा पहिले नोंदणीकृत खासगी ग्राहक असलेल्या नव्या तसेच सध्याच्या वाहनधारकांना लागू राहील. तसेच, टाटा EV ग्राहकांसाठी खास लॉयल्टी ऑफरसुद्धा देण्यात आली असून, Curvv EV आणि Nexon EV 45kWh खरेदीवर थेट 50 हजारपर्यंतचा लाभ दिला जात आहे.
हेही वाचा