Ravikant Tupkar Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांसह इतरावर दंगलीचे गुन्हे दाखल, बुलडाण्यातील शेतकरी आंदोलन चिघळल्याप्रकरणी कारवाई

बुलडाण्यात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आत्मदहनाचा प्रयत्न केसा होता.

Published by : Pankaj Prabhakar Rane

बुलडाणा : स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्यासह 18 जणांविरोधात पोलिसांना गुन्हा दाखल केले आहे. बुलडाण्यात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आत्मदहनाचा प्रयत्न केसा होता.प्रकरण चिघळल्यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला होता. या प्रकरणात पोलिसांनी 18 जणांवर रात्री उशिरा दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आंदोलनकर्त्यांना चिखली पोलीस स्टेशनमध्ये कोठाडीत ठेवण्यात आले आहे. आज दुपारी बुलडाणा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी बुलडाण्यात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. रविकांत तुपकर यांनी आंदोलनादरम्यान आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत असलेल्या तुपकरांनी बुलडाण्यात अचानक पोलिसांच्या वेशात येत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तुपकर यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.दरम्यान आंदोल चिघळल्याने कायदा सुव्यवस्थेतची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलन सुरु असतानाच कार्यकर्त्यानी दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा