ताज्या बातम्या

Ind vs Eng, Rishabh Pant : ऋषभ पंतचा मास्टर शॉट; मात्र गोलंदाज बेन्स्ट्रोकला आश्चर्याचा धक्का

भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 20 जूनपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेने झाली.

Published by : Team Lokshahi

भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 20 जूनपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेने झाली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत असून टीम इंडियाचा कप्तान शुभमन गिल याने पदार्पणातच चांगली कामगिरी करत दमदार शतक ठोकले. पहिला दिवस हा भारतीय फलंदाजांनी गाजवला. यशस्वी जयस्वाल याची ही कामगिरी वाखाणण्याजोगी होती.

लीड्स येथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजानी जबरदस्त कामगिरी करत इंग्लंड गोलंदाजांना नामोहरम केले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडिया फुल फॉर्ममध्ये होती. त्यामुळे कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी उत्कृष्ट खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना आपला रंग दाखवला. पहिली विकेट पडेपर्यंत के. एल. राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 91 धावांची पार्टनरशिप केली. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन यांनी आपल्या टीम इंडियासाठी शंभ पेक्षा अधिक धावांची पार्टनरशिप केली होती. मात्र त्यानंतर ऋषभ पंतने मैदानात आल्यानंतर आपला प्रभाव दाखवला. यशस्वी जयस्वाल हा बाद झाल्यानंतर ऋषभ पंतची एन्ट्री झाली. मात्र ऋषभ पंतने बेन्स्ट्रोकच्या दुसऱ्याच चेंडूवर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना दाखवत जोरदार शॉट मारला. ऋषभ पंतच्या या शॉटवर इंग्लंडचा गोलंदाज बेन्स्ट्रोकला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचा हा शॉट इंग्लंडचा गोलंदाज बेन्स्ट्रोकच्या कल्पनेपलीकडचा होता. त्यामुळे ऋषभ पंतच्या या मास्टर शॉटवर गोलंदाज बेन्स्ट्रोकने त्याचे अभिंनदन केले. त्या दोघांमध्ये याबाबत चर्चाही झाली.

इतकी चांगली सुरुवात झाल्यामुळे 17 वर्षानंतर पुन्हा एकदा विजेतेपद प्राप्त करण्याच्या दिशेने आपली टीम इंडिया योग्य दिशने वाटचाल करताना दिसत आहे. आता असेच टीम इंडिया खेळत राहिली, तर निश्चितच यंदाचे विजेतेपद टीम इंडियाच्या नावे होऊ शकेल, यात शंका नाही.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा