ताज्या बातम्या

“अमृता फडणवीस शुद्ध आणि पवित्र मात्र, सामनातून फडणवीसांवर निशाणा

Published by : Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती. यावरुन सारखा त्रास दिला जात असल्याने अमृता फडणवीस यांनी डिझायनर महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर आता अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे.

तसेच गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ‘आधीच्या सरकारने काय केले?’ हीच रेकॉर्ड वाजवून गुळगुळीत करीत आहेत. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर, दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे. या राज्यात सध्या काहीही घडू शकते. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही, अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे. त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. असे म्हणत टीका करण्यात आली आहे.

Sadabhau Khot : महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे

LSG VS KKR: लखनौचा दुसऱ्यांदा पराभव; कोलकाता नाईट रायडर्स 98 धावांनी दमदार विजयी

Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात

Nashik Crime: नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी