Admin
Admin
ताज्या बातम्या

क्षीरसागर काका पुतण्याच्या लढतीत पुतण्याचा विजय

Published by : Siddhi Naringrekar

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या पाच सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्षाची चर्चा चांगलीच रंगली होती. जयदत्त क्षीरसागर यांचे होमग्राउंड असणाऱ्या राजुरीमध्ये आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झालाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत होता. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा पराभव करत संदिप क्षीरसागर यांनी विजय मिळवला आहे.

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?