ताज्या बातम्या

धमकी प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, माझ्यावर हल्ला करायला ठाण्यात...

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊतांच्या फोनवर धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते आहे. यावर सुनील राऊत म्हणाले की, काल मला 3 - 4 वेळा धमकीचे कॉल आले. धमकीचा जो कॉल आलाय हे वरिष्ठांपर्यंत पोहचवण्यात आले आहे. असे वारंवार धमक्याचे कॉल आम्हाला येत असतात. मात्र सरकार यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. सरकारच्या विरोधात संजय राऊत बोलतात. सरकारने हे प्रकरणं केलं असावं. असा मला डाउट आहे. सरकारने आम्हाला कोणतेही संरक्षण दिलं नाही आहे. असे सुनिल राऊत म्हणाले.


यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, याच्याआधीही मला अशा धमक्या आल्या आहेत. मी ते फार गांभीर्याने घेत नाही. हे गृहमंत्री आम्हाला आलेल्या धमक्या गांभीर्याने घेत नाही तर आम्ही का घेऊ? ह्या सरकार पुरस्कृत धमक्या. आम्ही परिस्थितीला सामोरे जाऊ. संजय राऊतांवर कसा हल्ला करावा याच्या योजना ठाण्यात आखल्या जात आहेत. हे मी पुराव्यासह कळवले आहे.

मी पोलीस सुरक्षा मागत नाही. गृहमंत्र्यालय या प्रवृत्तींना उत्तेजन देतेय. हा सर्व प्रकार एकदिवस गृहमंत्र्यांना महागात पडणार असे संजय राऊत म्हणाले.

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात