बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला आता दोन महिने पूर्ण होणार आहेत. या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर दर्शन घेतलं. महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांना पाठिंबा दर्शवला. या घटनेमुळे सोशल मीडियावर पडसाद उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.
देशमुख कुटुंबीय भगवान गडावर
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आज पाथर्डी येथील भगवानगड येथे संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली आणि संतोष देशमुख हत्येसंदर्भात सर्व पुरावे नामदेव शास्त्री यांना दिले आहेत.
शहानिशा केल्याशिवाय बोलणं उचित नाही - धनंजय देशमुख
आपले भाऊ संतोष देशमुख दलित बांधवाला वाचवायला गेले होते. त्यांनी तिथे जात पाहिली नाही. आरोपींवर ४०-५० गुन्हे आहेत. पोलीस प्रशासानाने मस्साजोग गावाला सर्टिफिकेट दिलेलं आहे. ज्या व्यक्तीला आरोपींची बाजू घ्यायची आहे ती व्यक्ती या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देत आहे.
वैभवी देशमुखने नामदेव शास्त्री महाराज यांच्यासमोर मांडली कैफियत
मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने नामदेव शास्त्री महाराज यांच्यासमोर आपली ही कैफियत मांडली. बाबा तुम्ही महंत आहात. महाराज आहेत. तुम्ही आमचे गुरु असून तुमचा दर्जा फार मोठा आहे. मी तुमच्यासमोर फार लहान आहे. मात्र, तुम्ही जे बोललात की एकाच आपली मूळ आरोपींची मानसिकता तशी झाली आणि त्यामुळे त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली. तर माझ्या वडिलांच्या पोस्टमार्टममध्ये फक्त तीन हाडे असतील विसर्जनासाठी मिळाली आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार संपूर्ण शरीरावर असा कोणताही एक भाग नाही की जिथे मार लागलेला नाही अशी परिस्थिती असून आम्ही अजूनही त्यांचे ते फोटो पाहिलेले नाही. मग आमची मानसिकता कशी असेल. मात्र, तुम्ही या घटनेबाबत आमच्याकडून सर्व माहिती घेऊन बोललं पाहिजे होतं अशी विनंती वैभवी देशमुख यांनी महाराजांसमोर केली.
भगवान गड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठिशी - नामदेव शास्त्री
भगवानगडाला मानणारं हे कुटुंब आहे. भगवान गड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठिशी राहिल अशी ग्वाही देत असल्याचं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. भगवानगड हा कायम संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या पाठीशी उभा असल्याचं शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-