ताज्या बातम्या

Satara Rain : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; जनजीवन विस्कळीत

सातारा (Satara) जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली आहे. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या मात्र गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली या तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जोरदार वारे, पावसाच्या सरी, दाट धुके यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. पावसामुळे शहर आणि परिसराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

सातारा (Satara) जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली आहे. सुरुवातीला पावसाच्या (Monsoon) हलक्या सरी कोसळत होत्या मात्र गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली या तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जोरदार वारे, पावसाच्या सरी, दाट धुके यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. पावसामुळे (Monsoon) शहर आणि परिसराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोयना धरणांतर्गत (Koyna Dam) विभागासह पाटण तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून पावसामुळे धरण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ सुरू आहे. धरणात सध्या प्रति सेकंद सरासरी 34 हजार 407 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. मागील 24 तासात 2.97 टीएमसी पाण्याची आवक झाली असून पाणीउंचीत 5 फूट 5 इंचांनी वाढ झाली आहे. सध्या कोयना धरणात एकूण 32.50 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा 27.50 टीएमसी इतका आहे. प्रशासनाकडून वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना देण्यात आले आहेत.

पावसाने माणिकगड पहाडातील धबधबे खळाळले; पर्यटक घेतायत निसर्गाचा आनंदपावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे

सातारा - 26.60 मिलिमीटर

वाई - 23.30 मिलिमीटर

महाबळेश्वर - 82.60 मिलिमीटर

खंडाळा - 18.50 मिलिमीटर

जावली - 31.50 मिलिमीटर

पाटण - 68.00 मिलिमीटर

कराड - 23.10 मिलिमीटर

कोरेगाव - 9.40 मिलिमीटर

खटाव - 4.70 मिलिमीटर

फलटण - 3.30 मिलिमीटर

माण - 1.50 मिलिमीटर

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test