Senior advocate R Venkataramani
Senior advocate R Venkataramani  Team Lokshahi
ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी असणार भारताचे नवे 'महान्यायवादी'

Published by : Sagar Pradhan

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी (R Venkataramani) यांची देशाच्या नव्या महाधिवक्तापदी (Attorney General) नियुक्ती करण्यात आली आहे. आर व्यंकटरमणी यांची ही नियुक्ती पुढच्या तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने परिपत्रक काढून नियुक्ती जाहीर केली आहे.

अधिसूचनेनुसार, बुधवारी ज्येष्ठ वकील आर वेंकटरामानी यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारताचे नवीन महाधिवक्ता (Attorney General) म्हणून नियुक्ती करण्यात आली. ३० सप्टेंबरला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते केके वेणुगोपाल यांची जागा घेतील.

या आठवड्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारची अॅटर्नी जनरल म्हणून दुसरी टर्म करण्याची ऑफर नाकारली होती. रोहतगी जून 2014 ते जून 2017 या काळात अॅटर्नी जनरल होते.

अॅटर्नी जनरल पदासाठी काय असते पात्रता?

भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 अन्वये देशाच्या अ‍ॅटर्नी जनरल पदाची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने केली जाते. कलम ८८ नुसार अॅटर्नी जनरल देखील संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. ते संसदेचे सदस्य नसले तरी त्यांना कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. विधेयकाबाबतच्या चर्चेत ते सरकारची बाजू घेऊ शकतात. पण त्यांना संसदेत कोणत्याही विधेयकाबाबत मतदानात भाग घेण्याचा अधिकार नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा भत्ता दिला जात नाही.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...