New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
ताज्या बातम्या

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

Siddharth Shinde Passes Away : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे अकस्मात निधन, कायद्याच्या क्षेत्रात मोठी हळहळ.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी (15 सप्टेंबर) अकस्मात निधन झाले.

  • वयाच्या केवळ 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • हृदयविकाराचा झटका हा मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Senior Lawyer Siddharth Shinde Passes Away : : सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी (15 सप्टेंबर) अकस्मात निधन झाले. वयाच्या केवळ 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यायालयीन प्रकरणांतील गुंतागुंतीची भाषा सर्वसामान्यांना सहजपणे समजावून सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते विशेष ओळखले जायचे. त्यामुळे त्यांच्या निधनाने न्यायालयीन वर्तुळात तसेच कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात काम करत असताना शिंदे यांना अचानक चक्कर आली. तातडीने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. हृदयविकाराचा झटका हा मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धार्थ शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर आपली मते आणि कायदेशीर विश्लेषण सोप्या भाषेत मांडले होते. शिवसेना वाद, मराठा आरक्षण यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर त्यांनी दिलेले स्पष्टीकरण सर्वांना लक्षात राहिले. त्यामुळे कायद्याच्या क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शिंदे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. त्यांच्या जाण्याने न्यायालयीन क्षेत्रात एक जाणकार आणि संवेदनशील वकील हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर

Empty Stomach Eating : रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? वाचल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल...