ताज्या बातम्या

मोठी बातमी : शरद पवारांचा राजीनामा सदस्य समितीनं फेटाळला

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज फैसला होणार आहे. राष्ट्रवादीच्या समितीची आज प्रदेश कार्यालयात बैठक सुरु झाली आहे. सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या बैठकीत नेमका काय ठराव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. पवारांनी अध्यक्ष राहावे बैठकीत ठराव करण्यात आले आहे. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य