स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी दिली आहे. शिवसेना मंत्र्यांच्या बैठकित एकूणच कामाचा आणि पक्षवाढीबाबत घेतला आढावा त्यावेळी वर्धापन दिनाची जबाबदारी मुंबई, ठाणे व नवीमुंबईच्या नेत्यांवर सोपवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मंत्र्यांला विभागवारनुसार ५ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुका जाहीर होण्याची वाट न पाहता मंत्र्यांनी जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये कामाला लागण्याच्या सूचना सर्व मंत्र्यांना बैठकित दिले आहेत. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खालीलप्रमाणे विभागनिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:
पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)
मंत्री शंभूराज देसाई
मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मंत्री उदय सामंत
मंत्री भरत गोगावले
मंत्री योगेश कदम
मराठवाडा विभाग
मंत्री संजय शिरसाठ
विदर्भ विभाग
मंत्री संजय राठोड
मंत्री आशिष जैसवाल
खानदेश विभाग
मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री दादा भुसे
पालघर, मिरा-भाईंदर आणि मुंबई उपनगर
मंत्री प्रताप सरनाईक
या जबाबदाऱ्यांच्या वाटपामागे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी, स्थानिक संपर्क वाढवणे आणि संघटनात्मक कामे गतिमान करणे हे उद्दिष्ट असल्याचे समजते.
हेही वाचा..